Dussehra Melava : दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काल मुंबईत राजकीय युध्द पाहिला मिळालं. सेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक वस्त्रहरण रंगलं. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) तर बीकेसी (BKC) मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भाषणं झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. अनेक मुद्द्यांवर एकमेकांवर टोलेबाजी करण्यात आली. दोन्ही नेत्यांच्या भाषणावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टोला लगावला आहे. शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपचं (BJP) स्क्रीप्ट हे ऐकून ऐकून कंटाळ आला. आता ठाकरेंनी आपला स्क्रीप्ट रायटर बदवावा असा टोला फडणवीसांनी मारला. तसंच खरी शिवसेना कोणती हे काल एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलं असं फडणवीस म्हणाले. बीकेसीची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे, पण बीकेसी तुडुंब भरलं होतं असं फडणवीस म्हणाले. तर ठाकरे गटाने याला उत्तर दिलं आहे.  तुमचं स्क्रीप्ट बरोबर बाहेर आलं असं प्रत्युत्तर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिलं आहे. 


पोलिसांनी दिली आकडेवारी
दरम्यान, दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अभूतपूर्व असं नियोजन केलं होतं. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केला. 10 हजारांहून अधिक एसटी बसेस (ST Bus), खासगी बसेस (Private Bus), गाड्या बुक करण्यात आल्या होत्या. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले होते.


आता पोलिसांनी कोणत्या मेळाव्याला जास्त लोकं होती याची आकडेवारी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या अंदाजानुसार शिंदे गटाच्या मेळाव्यात साधारण 1 लाख 25 हजार लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या मेळाव्याला सुमारे 65 हजारांधून अधिक लोकं उपस्थित होते.  शिवाजी पार्क मैदानाची क्षमता 50 हजार इतकी आहे. 


तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 1 लाक 25 हजार लोक उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याच मैदानात पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती, त्यावेळी जवळपास 97 हजार लोकांची उपस्थिती होती अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.