मॅगी खात आहात तर कॅन्सर होण्याची शक्यता
मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे.
मुंबई : मॅगीमध्ये शिश्याचे प्रमाण अधिक असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. शिसे आणि सोडियम ग्लुटामेटमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते, अशी माहिती ओबेसीटी सर्जन डॉ. संजय बोरुडे यांनी दिली आहे. मॅगी हे आंतरराष्ट्कीय ब्रँड आहे. त्यामुळे त्यास्तरावर उपाययोजना व्हायला हव्ययात, असेही ते म्हणालेत.
मॅगी खात असाल तर सावध व्हा. मॅगीवर पुन्हा बंदी येण्याची शक्यता आहे. मॅगीमध्ये अतिरिक्त प्रमाणात शिसे असल्याची कबुली खुद्द 'नेस्ले' कंपनीने सर्वोच्च न्यायालयासमोर दिली आहे. त्यावर, शिसे असलेली मॅगी मुलांनी का खावी? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. ग्राहक मंत्रालयाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाअंतर्गत नेस्ले कंपनीवर 'मॅगी' संदर्भात दाखल केलेल्या ६४० कोटी रूपयांच्या दाव्याची फाईल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा उघडली आहे. १६ डिसेंबर २०१५ ला सर्वोच्च न्यायालयाने दाव्याच्या सुनावणीला स्थगिती दिली होती.
मॅगीत शिसे असल्याचे जेव्हा समोर आले तेव्हा कंपनीने या वृत्ताचे खंडन केले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना मॅगीच्या वकिलांनी कंपनीवर असलेल्या आरोपांचा स्वीकार करत यात अतिरिक्त शिसे असल्याचे मान्य केले होते. 'दोन मिनिटांत तयार' होते अशी जाहिरात केल्यामुळे अनेक ग्राहक आपली भूक मिटवण्यसाठी हे उत्पादन वापरतात. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने NCDRC ला पुढची कारवाई करण्यास हिरवा कंदिल दिला आहे.