मुंबई : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. (ed enforcement directorate arrested to mumbai ex police commissioner)


नक्की प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांडे यांना NSE फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना अनेक प्रकरणांमध्ये आरोपी करण्यात आलं आहे. संजय पांडे यांची आज सकाळपासून (19 जुलै) ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. या चौकशीनंतर संजय पांडेला अटक करण्यात आली. 


याआधी सोमवारी सीबीआयने संजय पांडे यांची चौकशी केली. काही महिन्यांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देसाई यांच्यावर 100 कोटी रुपये वसूलीचे आरोप केले होते. ईडीने या प्रकरणाबाबतही संजय पांडे यांची चौकशी केली.


संजय पांडे यांच्याबाबत थोडक्यात (Who Is Sanjay Pandey)


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं होतं.  त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. संजय पांडे यांच्या नाराजीनंतर त्यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान पांडे 30 जून रोजी पोलीस दलातून निवृत्त झाले.


संजय पांडे यांना ईडीकडून अटक