मुंबई : ११ हजार ५०० कोटी रुपयांचा बॅंक घोटाळा करुन पोबारा केलेल्या नीरव मोदींच्या घर, कार्यालयं आणि दुकानांवर आजही ईडी कडून छापा सत्र सुरु आहे. मुंबईत आज पहाटे ईडीनं 3 ठिकाणी छापे टाकले.


५ हजार १०० कोटी रुपयांचे दागिने जप्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल मुंबई, दिल्ली, सुरत आणि हैदराबाद येथे टाकलेल्या एकूण १७ छाप्यांमध्ये तब्बल ५ हजार १०० कोटी रुपयांचे दागिने ईडीने जप्त केलेत. 


महत्वाची कागदपत्रं आणि मालमत्ता


तसंच नीरव मोदी यांच्या संबंधित इतरही काही महत्वाची कागदपत्रं आणि मालमत्तांची माहिती इडीला मिळाली आहे. ते जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याचं इडीनं सांगितलं आहे.