मुंबई : राज्याच्या राज्यात कारणात खळबळ उडवणारी बातमी समोर येतेय. शिवसेना नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. पीएमसी बॅक घोटाळाप्रकरणी ही नोटीस असल्याचे सांगितले जातंय. संजय राऊत हे वेळोवेळी भाजप विरोधात भूमिका घेत असतात. केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर करुन ईडी सारख्या यंत्रणा मागे लावत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज संजय राऊतांनी नुकतीच व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


याआधी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली होती. तसेच शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या मुलांना देखील ईडीने नोटीस पाठवली होती. वर्षा राऊत यांना नोटीस आल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली नाहीय. विरोधकांवर नेहमी तूफान फटकेबाजी करणारे संजय राऊत काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपशी काडीमोड झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन राज्यात ठाकरे सरकार सत्तेपर्यंत्त येण्यात संजय राऊतांची भूमिका महत्वाची राहिलीय. भाजपच्या राज्यातील नेत्यांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांवर राऊतांनी आपल्या लेखणीतून प्रहार केलाय.