मनोहर जोशींचे पूत्र उन्मेष जोशींची ईडीकडून चौकशी
लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव आहेत उन्मेष जोशी.
मुंबई : लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी बोलावलं आहे. आज उन्मेष यांची चौकशी सुरु आहे. उन्मेष जोशी आणि अन्य दोन व्यावसायिकांनी मिळून भागिदारीत व्यवसाय सुरू केला होता. यात आयएलएफएस या संस्थेनं २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत कंपनीने आपले समभाग केवळ ९० कोटी रूपयांना विकले.
समभाग विकल्यावरही आयएलएफएसने कोहिनूर सीटीएनएल या इमारतीसाठी अगाऊ कर्ज दिलं. मात्र या कर्जाचा परतावा कोहिनूरने न केल्याचं सांगितलं जातं आहे. त्यानंतर २०११ मध्ये कोहिनूर सिटीएनएल कंपनीने आपली काही मालमत्ता विकून ५०० कोटींच्या कर्जाचा परतावा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर आयएलएफएसने कोहिनूरला १३५ कोटींचं कर्ज दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी याआधीच ईडीने कोहिनूर सीटीएनएलच्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे.