मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली आहे. राऊत त्यांच्या भांडुपच्या घरी इडीचे अधिकारी दाखल झालेत. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी आता पुढील कारवाई काय होणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे. 


काय आहे पत्रा चाळ प्रकरण? 


  • गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार

  • पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते

  • एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते

  • उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते

  • बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक

  • गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुस-या बिल्डरला विकली