मुंबई :  अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. अखेर अर्णब गोस्वामी यांना ८ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येस अर्णब गोस्वामी यांना जबाबदार धरण्यात आले. या आत्महत्ये प्रकरणी अर्णब यांना ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. अखेर ८ दिवसांनंतर ते  कारागृहातून बाहेर आले आहे. कारागृहातून बाहेर येताच त्यांनी आपले शक्तीप्रदर्शन दाखले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी सुप्रीम कोर्टचा आभारी आहे. हा भारताच्या जनतेचा विजय आहे.' असं म्हणतं त्याने वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या. कारागृह परिसरात यावेळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी जनतेनेही वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. सध्या सोशल मीडियावर #ArnabIsBack हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. 


एवढचं नाही तर काहींनी त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव देखील केला. अर्णब गोस्वामी कारागृहातून बाहेर पडताच त्याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली. जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला होता.