LIVE VIDEO अशी होणार १० वीची परीक्षा, शिक्षणमंत्र्यांनी सांगितला परीक्षेचा फॉर्म्यूला
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षांविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या गुणांचा मूल्यमापनांचा फॉर्म्युला सांगितला आहे. यात अकरावीच्या निकालासाठी देखील काही निकष सांगितलेले आहेत. काय म्हणाल्या याविषयी महत्त्वाचे मुद्दे खाली देत आहोत.
प्रत्येक विषयांचं १०० गुणांचं मूल्यमापन होणार
नववीच्या गुणाचे ५० टक्के गुण ग्राह्य धरणार
मूल्यमापनावर आक्षेप असल्यास कोरोनानंतर परीक्षा
अकरावी प्रवेशासाठी २ तासांची सीईटी
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत सीईटी
लेखी मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिक मूल्यमापनासाठी २० गुण
प्रत्येक विषयासाठी १०० गुणांचं मूल्यमापन
जून महिन्याच्या अखेरिस निकाल जाहीर करणार