मुंबई : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात वाकोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाचे ज्येष्ठ नेते  एकनाथ खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी  तक्रारी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खडसे यांनी जळगावमधील सभेत उपस्थितांना संबोधित करताना दमानिया यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.


२ सप्टेंबर रोजी खडसे यांचा वाढदिवस साजरा झाला. मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, राजेंद्र फडके आदींच्या प्रमुख उपस्थित खडसेंनी टिप्पनी केली होती.