मुंबई : आज झी 24 तास सोबत बोलताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दमानिया यांनी चुकीचे आरोप करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. फडणवीस यांनी फोन करुन गुन्हा दाखल करायला लावला. असा आरोप देखील खडसे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'10-12 मंत्र्यांवर आरोप झाले. सगळ्यांना क्लीनचीट मिळाली. मी एकटाच कसा राहिलो. मी निर्दोष होतो. ज्यांच्याकडे जावं ते देवेंद्र यांचं नाव घेत होते. मला नाराजी होती. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला.' असं देखील खडसे यांनी म्हटलं आहे.


'राजीनामा द्या, 3 महिन्यानंतर पुन्हा घेतो असं आश्वासन दिलं गेलं. मला बदनाम केलं गेलं. दाऊदशी संबंधित जोडले गेले. माझं म्हणणं ऐकलं गेलं नाही. बदनाम करण्यासाठी षडयंत्र होतं. मुख्यमंत्रीपदासाठी मी शर्यतीत होतो. खोटे गुन्हे दाखल केले. पक्षात राहून ते सहन केलं.'


'मी स्वत: राजीनामा दिला नव्हता. पक्षाने राजीनामा द्यायला सांगितला होता. 3 महिन्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असं आश्वासन दिलं गेलं. मी विचारलं माझा दोष काय आहे. देवेंद्रजी यांनी सांगितलं होतं की, 3 महिन्यात परत घेऊ. त्यांना विचारु शकता.'


'कोणाला तरी लावून द्यायचं आणि आरोप करायचे हे ठरलेलं गणित होतं. आरोप केले की लगेच चौकशी लावायची हे सुरु होतं. दाऊदसोबत संबंध आहे असे आरोप करणारे यांच्या शेजारी बसलेले असतात. हे कसं होतं.'


'ज्यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यांचा राजीनामा घेतला नाही. माझा काय गुन्हा आहे सांगितलं का नाही मग. माझा दोष असेल तर मान्य करु.' 


'देवेंद्रला संधी मी दिली. मला तो अधिकार होता. 2009 ते 2014 दरम्यान आम्ही अनेक आरोप केले. ज्यामध्ये तथ्य निघालं. ज्यामुळे 123 जागा आल्या. 2019 ला सगळं असूनही, युती असूनही 105 का आले? हा अहमपणा होता. मी पुन्हा येणार हे जनतेला आवडलं नाही.' असा आरोप देखील खडसे यांनी आज केला आहे.