मुंबईसाठी सर्वात महत्त्वाची बातमी पहा ! एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबईसाठी सर्वात महत्त्वाची बातमी
मुंबई : मुंबईत एकूण २८ लाख रहिवाशी घरे असून त्यापैकी १५ लाख घरे ५०० चौरस फुटापर्यंतची आहेत. या घरांसाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची घोषणा आज विधानसभेत केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने लवकरच महाविकास आघाडी सरकार निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीत ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यानंतर महापालिकेत शिवसेनेची सत्ता येताच महापालिकेने मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.
मुंबईतील ५०० चौरस फूटाखालील घरांना सरसकट करमाफी मिळणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
हा निर्णय घेतल्यामुळे महापालिकेचे दरवर्षा ३४० कोटी रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. पालिकेने पाठविलेल्या या प्रस्तावावर विचार विनिमय सुरु आहे. तसेच, यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या निर्णयामुळे मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्यांना लाभ मिळणार आहे.