मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना फोनवर चर्चा झाली. राज ठाकरे यांच्या तब्येतीची एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली होती. मात्र सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील फोन वरील चर्चा महत्त्वाची घटना मानली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. पण राज ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फोन केला होता.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कोरोनाचा डेड सेल आढळून आल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. अखेर लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही महिने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


एकनाथ शिंदे हे देशात सध्या चर्चेत आहेत. इतकंच नाही तर इतर देशांमधून ही एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे.


महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारवर संकट ओढावलं आहे. जवळपास 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


भाजपने यावर अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीदाची ऑफर असल्याची माहिती आहे.