मुंबई : Eknath Shinde Camp Dussehra Melava speech in Mumbai loca : आता बातमी आहे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची. मुंबईतील लोकलमध्ये बीकेसीवरील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील भाषण थेट एलईडी टिव्हीवर दाखविण्यात आले होते. याबाबत सोशल मीडियावरुन अनेकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने दखल घेतली. त्यानंतर कारवाई करताना संबंधितांना दंड ठोवण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकलमध्ये दाखवल्याने पश्चिम रेल्वेने कंत्राटदाराला दंड ठोठावला आहे. परवानगी नसतानाही शिंदेंच्या सभेचे थेट प्रक्षेपण लोकलमध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटं दाखवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्यात जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी एलईडी टिव्ही बसवण्यात आले आहेत. त्यावर सभेचं थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने काही प्रवाशांनी पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याची माहिती दिली. 


यावेळी कंत्राटदाराने कराराचा भंग करुन हे प्रक्षेपण केल्याचे समोर आले आहे. शिंदे यांच्या सभेच्या प्रक्षेपणाची परवानगीही रेल्वेकडून देण्यात आली नव्हती. याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला आहे. त्याचबरोबर आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.