Maharashtra Politics : राज्यातील सत्तातरानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे (eknath shinde) - देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली होती. तसेच मंजूर केलेला निधी स्थगित करत मोठा झटका दिला होता. या निर्णयानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. त्यानंतर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi) काळात सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीला (Shiv bhojan Thali) ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या शिवभोजन थाळीची (Shiv bhojan Thali) योजना बंद करण्यात येणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारला शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे आता ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. (eknath shinde devendra fadnavis government may be close Shivbhojan Thali scheme)


या योजनेतंर्गत राज्यातील जनतेला 10 रुपयांत जेवण मिळत होते. त्यामुळे आता ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. कोरोना काळात या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळत होता. कोरोना काळात या थाळीची किंमत 5 रुपये करण्यात आली होती. तर काही काळासाठी ही थाळी मोफत देण्यात येत होती.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.  


सध्या राज्यात एक लाख 88 हजार 463 एवढ्या थाळ्यांची विक्री होते. याची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रस्ताव आणला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारसमोर आला. मात्र, त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या योजनेला स्थगिती मिळणार की तशीच सुरु राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.