मुंबई :  राज्यातील अनेक दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर (Maharashtra Political Crisis) एकनाथ शिंदे-भाजप सरकार (Eknath Shinde) स्थापन झालं. सत्तास्थापनेपासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे सरकारने अनेक निर्णयांचा धडाका लावलाय. मात्र दुसऱ्या बाजूला शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थिगिती दिली. आता शिंदे सरकारने आणखी एका माजी मंत्र्याला धक्का दिलाय. (eknath shinde government canceld tender of former food supply minister chhagan bhujbal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न नागरी पुरवठा मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांना मोठा झटका दिलाय. राज्य सरकारने मविआ सरकारमधील अन्न नागरी विभागातील कामांना स्थगिती दिली आहे.


भुजबळ यांच्या अन्न नागरी पुरवठा विभागअंतर्गत गोदाम निविदा काढण्यात आल्या होत्या. पण निविदा काढल्यानंतरही अनेक कामं सुरु झाली नव्हती. अशा कामांना शिंदे सरकारने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.