एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, अल्पमतात असलेल्या व्हीपला निलंबनाचा अधिकारच नाही !
Maharashtra Political Crisis : आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव आहे, घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
मुंबई : Maharashtra Political Crisis : आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव म्हणजे रडीचा डाव आहे, घाबरवण्याचा प्रयत्न आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तसेच अल्पमतात असलेल्या व्हीपला निलंबनाचा अधिकारच नाही, असं त्यांनी म्हटले आहे. आपल्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचा दावा शिदेंनी केला आहे.
एकनाथ शिंदेंनी काही वेळापूर्वी 'झी 24तास'शी बातचीत केली, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे बंडखोर आमदार गटाची गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये बैठक झाली. पुढील रणनिती आखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पाठिंबा काढण्याचं पत्र शिंदेगट आजच देणार असल्याची शक्यता आहे. राज्यपालांना हे पत्र दिलं जाईल अशी शक्यता आहे. शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र आजच हे आमदार राज्यपालांना देतील. त्याचवेळी शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे.
आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र आज राज्यपालांना देण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात सत्तांतरासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांचा गट गुरुवारी दुपारनंतर अधिक सक्रिय झाला. रविवार सायंकाळपर्यंतच नवे सरकार सत्तारुढ करण्यासाठी त्यांच्याकडून तासातासाची मोर्चेबांधणी केली जात आहे.
शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडत असल्याचे पत्र शुक्रवारी हे आमदार राज्यपालांना देतील. त्याचवेळी शिंदे समर्थकांच्या शिरगणतीचीही तयारी आहे. त्यानंतर काही तासातच शिंदे गट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचीही भेट घेऊन विधीमंडळ गटनेतेपदी शिंदेंच्या निवडीचे पत्र देईल. तेथेही सह्यांची तपासणी, शिरगणती होईल आणि प्रतोदपदी भारत गोगावले असतील याचे पत्र दिले जाण्याची शक्यता आहे.