मुंबई : शेतक-यांच्या महामोर्चाने आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलं आहे. शेतक-यांचा महामोर्चा आज ठाण्यातल्या आनंदनगर टोलनाका मार्गावरुन मुंबईत प्रवेश करणार आहे. यावेळी मुंबईत वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचं नियोजन केलं आहे. 


हळू हळू या मोर्चाला राजकीय सोबत मिळत आहे. जस जसा हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं येऊ लागला.. त्याची भव्यता पाहून अनेक पक्षांनी, संघटनांनी त्याला पाठींबा दिला


काय म्हणाले एकनाथ शिंदे 


ठाण्यात किसान लाँग मार्चमध्ये सहभागी झालेल्या शेतक-यांशी ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. तसंच हा मोर्चा आणि शेतक-यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर शिवसेनेच्या भूमिकेचं शेकाप नेते जयंत पाटील यांनी स्वागत केलंय.