Maharashtra Politics : एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) हिंदुत्वाचे (Hindutva) विचार जपण्यासाठी भाजपशी (BJP) युती केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) वारंवार सांगत असतात. हिंदुत्वाचा हाच मुद्दा व्यापक करण्यासाठी शिंदे गट राज्यभरात हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार आहे. याच यात्रेदरम्यान एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच हातात रुद्राक्षांच्या (Rudraksha) माळा घेणार आहेत. शिंदेंच्या सहकाऱ्यांनी त्यांना 1 हजार रुद्राक्षांच्या माळा भेट दिल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे हिंदू गर्व गर्जना यात्रेत रुद्राक्षाच्या माळा हातात घातलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लूक दिसू शकतो. इतकंच नाही तर शिंदेंना भगवी शाल द्यायच्या तयारीत त्यांचे सहकारी आहेत. हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा बनण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय, 


अंगावर शाल, गळ्यात-हातात मोठे रुद्राक्ष असा बाळासाहेब ठाकरेंचा 1990 नंतर लूक होता. शेवटपर्यंत भगवा पेहराव आणि रुद्राक्ष बाळासाहेबांसोबत होतं. बाळासाहेब म्हटलं की डोळ्यासमोर आजही हाच भगवा आणि रुद्राक्ष येतो. भगवा पेहराव आणि रुद्राक्ष यामुळे बाळासाहेबांची हिंदूह्रदयसम्राट अशी प्रतिमा आणखीच प्रखर व्हायची. आता शिंदेही भगवी शाल आणि रुद्राक्ष हातात घेऊ शकतात.कट्टर हिंदुत्वरक्षक अशी प्रतिमा ठसवण्यासाठीच शिंदेंचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.


शिंदे गटाच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हिंदुत्वाचा नारा देण्यात आला. या बैठकीवेळी स्टेजवर लावलेल्या पोस्टरवर 'गर्वसे कहो,हम हिंदू है'चा नाराही लिहिण्यात आला होता.