CM Eknath Shinde Live : मला वैयक्तिक स्वार्थ नव्हता, सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते ही वस्तूस्थिती आहे, सर्व आमदारांना माहित होतं, पण अजित पवार आणि कोणी सांगितलं, एकनाथ शिंदे नको, मी कोणत्याही पदाची लालसा केली नाही आणि करणार नाही, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलाआहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा अजित पवार बोलता बोलता बोलून गेले, इथेही अपाघातच झाला आहे, तेव्हा मी त्यांना बाजूला घेऊन विचारलं, त्यांनी मला सांगितलं आमचा कोणाचा विरोध असण्याच कारण नव्हतं, तुमच्या पक्षाचा तो विरोध होता. पण मी कधीही विचारलं नाही. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायला सांगितलं, तेव्हाही आम्हाला काही हरकत नव्हती. एकाही शब्दाने कधी विचारलं नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?
आज आम्ही जो निर्णय घेतला त्यामागचं कारण म्हणजे जे आमदार निवडून आले आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ते आमदार आमदार मला सांगत होते, आपली युती भाजपबरोबर आहे, आपण हे सर्व दुरुस्त करा, उद्धव ठाकरे यांना सांगा हे चालणार नाही. हे बदला, मी पाचवेळा प्रयत्न केला. पण आम्हाला यश मिळालं नाही. 


जी अडीच वर्ष गेली त्यात आम्हाला जो अनुभव आला.  सावरकरांबद्दल कधी बोलू शकत नव्हतो काँग्रेसबरोबर असल्यामुळे, ज्या दाऊदने बॉम्बस्फोट केले मुंबईत त्यांच्याशी कनेक्शन होतं त्यांच्यावर आम्ही कारवाई करु शकलो नाही. बाळासाहेबांनी संभाजीनगर नाव दिलं होतं, ते आम्ही करु शकलो नाही असं सांगत एकनाथ शिंदे यांनी आघाडीतून बाहेर पडण्याचं कारण सांगितलं.


आम्ही कालही शिवसैनिक होतो आणि उद्याही शिवसैनिकच आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आनंद दिघेंचं शिवसैनिक आहोत असंही एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं.