Dasara Melava : `माझी आई मृत्यूशय्येवर होती, पण...` एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आसूड!
Maharastra Politics : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
Eknath Shinde Dasara Melava : शिवसेनेच्या दोन्ही गटांचा आज दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) पार पडला. शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर (Uddhav Thackeray) चौफेर टोलेबाजी केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
भगवी लाट मला इथं पहायला मिळत आहे. आम्ही सत्तेला लाथ मारली पण बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. बाळासाहेबांचे विचार आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही मुठमाती दिली. खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलंय. हे हमासची गळाभेट देखील घेतील. किती लाचारी करणार? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटला. यांनी निर्लज्यपणाचे कळस गाठले. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आम्हाला दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यातील पैसे 50 कोटी मागितले. माझ्यापेक्षा जास्त यांना कोण ओळखतं का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. यांना खोके नाही तर कंटेनर पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
अब्दुल सत्तारांचं कौतूक
आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांचं कौतुक केलं.
तुमची तुमचा चेहरा आरश्यात पाहवं. लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढे मुखवटे तुम्ही बदलले. मी मुंख्यमंत्री झालो तरीही मी माझ्यातला कार्यकर्ता मरू दिला नाही. सोन्याचा चमचा घेणाऱ्यांनीच मुख्यमंत्री होणार, असं काही लिहिलं आहे का? मुख्यमंत्री बदलणार असं तुम्ही म्हणता. पण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. मी माझ्या परिवालाला वेळ दिला नाही. माझ्या मुलांना वेळ दिला नाही.
माझी आई मृत्यूशय्येवर होती. लोकसभा निवडणूक होती. जवारला घाट चढत असताना मला डॉक्टरांचा फोन आला, मी सगळं आटोपून 9 वाजता पोहोचलो. माझ्या आईचा मृत्यू झाला होता, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतलं होतं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी संधीसाधू बनले, 2006 साली जेव्हा पूर आला होता. तेव्हा तुम्ही बाळासाहेबांना मातोश्रीवर एकटं सोडून तुम्ही हॉटेलवर रहायला गेलात. जनता तुम्हाला माफ करणार नाही. जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाहीत. ते तुमचे काय होणार?
राज ठाकरेंबद्दल दिघे साहेब चांगलं बोलले तेव्हा त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. मला विचारण्यात आलं. आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठं आहे. तो फकिर माणूस.. त्याच्याकडे काय असणार? एकनाथ शिंदे यांना खोट्या घोटाळ्यात अटकवण्याचं काम तुम्ही केलं. पण आम्ही तुमचाच टांगा पलटी केला, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चिमटे काढले. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर देखील भाष्य केलंय.