मुंबई : एलफिन्स्टन स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीची दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीय. त्यावर पश्चिम रेल्वे आणि एनआयए यांनी आपलं म्हणणं मांडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन आठवड्यानंतर या याचिकेसंदर्भात सुनावणी होणार आहे. फैसल बनारसवाला आणि अब्दुल कुरेशी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. रेल्वे पूल मोकळे करा, रूंद करा, फेरीवाले मुक्त करा अशी मागणी यात करण्यात आलीय. 


एलफिन्स्टन पुलावर झालेली चेंगराचेंगरी ही अफवेमुळ झाल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हा घातपात घडवण्याचा प्रकार होता का याचाही तपास व्हावा अशी मागणी याचिकेत करण्यात आलीय.