मुंबई : मुंबईतल्या एलफिन्सटन रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात येणार आहे. एलफिन्सटन स्टेशनचं नाव बदलून आता प्रभादेवी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेनं याबाबतचं पत्र मुंबई विभागाला पाठवलं आहे. थोड्याच दिवसांमध्ये बदल झालेले फलक स्टेशनवर पाहायला मिळणार आहेत. याआधी नुकतंच छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं होतं. 


पश्चिम रेल्वेचं मुंबई विभागाला पत्र