मुंबई : तब्बल ७-८ तासांच्या चौकशीनंतर ईडीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईक्बाल कासकर यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर भरसकाळी मलिकांची ईडीने चौकशी केली. यानंतर अखेर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे आता पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. (enforcment dirctporate arrest to minority minister nawab malik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाब मलिक यांना अटक केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळातून या अटकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मलिकांना झालेल्या या अटकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार असल्याचं दिसत आहे. 



नवाब मलिक यांना मनी लाँड्रिग प्रकरणात ही अटक केली गेली आहे. ईडीचा ताफा आज सकाळीच मलिकांच्या घरी पोहचला. मलिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं.  त्यानंतर मलिकांची चौकशी करण्यात आली. ही माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली. तसेच केंद्र सरकार हे केंद्रीय तपास यंत्रणेचा सूड बुद्धीने वापर करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. 


या सर्व गदारोळादरम्यान मलिकांची चौकशी सुरुच होती. मात्र यानंतर अखेर 7-8 तासांनी ईडीने त्यांना अटक केली. विशेष बाब म्हणजे नवाब मलिक हे मंत्रीपदावर असताना अटक झालेले दुसरे मंत्री ठरले आहेत. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक करण्यात आली होती. 


दरम्यान आता मलिकांचं मेडिकल चेकअप होणार आहे. या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात घेऊन जाणार असल्याचं समजतंय. या तपासणीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे.