ईडीचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, पाहा कोण आहेत श्रीधर पाटणकर?
ईडीची आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई
ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधु श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन (Pushpak Bullion) या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पाील (Nilambari Project) 11 सदनिका सील करण्यात आल्या असून जप्त केलेली मालमत्ता तब्बल ६.४५ कोटी रुपयांची आहे.
महाविकास आघाडी सरकारमधल्या अनेक नेत्यांच्या पाठिमागे ईडीचा ससेमिरा सुरु आहे. पण ईडीने आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केल्याने महाविकास आघाडी सरकारला हा मोठा हादरा मानला जात आहे.
श्रीधर पाटणकर कोण आहेत?
श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे उद्योजक असून ते डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर यांचे वडिल माधव पाटणकर हे देखिल मोठे उद्योजक होते. श्रीधर पाटणकरांच्या ठाणे इथल्या निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्कप बुलियन कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं.
नेमक प्रकरण काय आहे?
2017 मध्ये 20 ते 30 कोटी रुपये पुष्पक बुलियन कंपनीने नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला हवालाच्या माध्यमातून वळते केले होते. हवाला रॅकेट चालवणाऱ्या नंदकिशोर तिवारी या व्यक्तीने दोन तीन शेल कंपन्या उभ्या करुन ते पैसे दुसऱ्या कंपन्यांना दिले. त्यानंतर ते पैसे श्रीधर पाटणकर यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले असा आरोप आहे.