मुंबई : मुंबईतील आजची रविवारची सकाळ शिवसेनेसाठी मोठा धक्का घेऊन आली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून EDच्या रडारवर होते. आज सकाळी संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरावर EDची टीम पोहोचली आणि मुंबईत एकच खळबळ माजली आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडीची थेट कारवाई हा शिवसेनेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शिंदे गटाच्या धक्कानंतर शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा झटका बसल्याचं बोलं जातं आहे. 


यापूर्वीही संजय राऊतांवर EDची कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात कारवाई करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईत दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील 8 भूखंड जप्त केले होते. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात एप्रिल महिन्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनी अटक करण्यात आली होती. 


मात्र, आता ईडीने प्रत्यक्षात संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यापूर्वी EDने उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्याही संपत्तीवर टाच आणली होती. आजच्या कारवाईनंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा फेरा थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला आहे. 


काय आहे पत्रा चाळ प्रकरण? 


  • गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार

  • पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते

  • एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते

  • उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते

  • बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक

  • गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुस-या बिल्डरला विकली