सीमा हैदरच्या चित्रपटावरून मनसे आक्रमक, हातपाय तोडण्याचा इशारा... निर्माता म्हणाला `मुंबईत येतोय`
समाजवादे पक्षाचे नेता अभिषेक यांच्यानंतर आता ममनसेही बॉलिवूड मिर्माता अमित जानी यांना इशारा दिला आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदरला घेऊन चित्रपट बनवण्याच्या घोषणेनंतर आता वाद उभा निर्माण झाला आहे. अमित जानी यांनीही या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे.
Seema Haider Movie : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला (Seema Haider) घेऊन चित्रपट बनवण्याचं बॉलिवडू निर्माता अमित जानी (Amit Jani) यांनी जाहीर केलं आहे. पण यावरुन जोरदार वाद सुरु झाला आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (MNS) अमित जानी यांनी इशारा दिली आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या लव्हस्टोरीवर (Seema-Sachin Love Story) चित्रपट बनवण्याची घोषणा केली असून या चित्रपटाचं नाव 'कराची टू नोएडा' असं असणार आहे. इतकंच नाही तर अमित जानी उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडवरही चित्रपट बनवत असून या चित्रपटात सीमा हैदरला RAW एजेंटच्या भूमिकेची ऑफर करण्यात आली आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या लव्ह स्टोरीवर अमित जानी चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचं नाव 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है' असं ठेवण्यात आलं आहे.
मनसेचा इशारा
पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्र सहन करणार नाही आमची आधीपासून हीच भूमिका आहे असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. 2016साली आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही 48 मुदत तासाची मुदत दिली होती त्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकारांनी इथे काम केलं नव्हतं. कुठल्याही पाकिस्तानी कलाकार चालणार नाही आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिका ठाम आहोत, असं खोपकर यांनी म्हटलंय. आपल्या देशावर हल्ले झाले मागच्या आठवड्यात पुण्यातही काही अतिरेकी पकडण्यात आले आणि आपण या पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन देतोय अशी टीका अमेय खोपकरांनी केलीय.
मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांनी टीव्ही चालू केल्यावर या पाकड्यांचं मनोरंजन बघायचं का? असा इशाराच खोपकर यांनी दिलाय. मी ठाम इशारा देतोय या बॉलीवूडवाल्यांना कोणत्याही प्रकारच्या पाकड्यांना घेऊन जर काम केलं तर तुमचे हात पाय तोडू, आमच्या जवानांचा आणि आमच्या देशाचा आपण आम्ही सहन करून घेणार नाही असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. सीमा हैदर हिला घेऊन कोणीतरी बॉलीवूड निर्माता चित्रपट तयार करत आहे. तुम्ही चित्रपट तयार करा पण हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन दिला जाणार नाही असही खोपकर यांनी सांगितलं.
अमित जानी यांचं उत्तर
जानी फायरफॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकिय संचालक अमित जांनी यांनी मनसेच्या इशाऱ्याला उत्तर दिलं आहे.' कराची टू नोएडा' चित्रपटाच्या शुटिंगसाठी आपण 19 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. मनसेने आपल्याला हात लावून दाखवावा असं अमित जानी यांनी म्हटलं आहे. कोणत्याही धमकीला घाबरत नसल्याचं अमित जानी यांनी सांगितलं.
याआधी सपाचे माजी प्रवक्ता अभिषेक सोम यांनीही अमित जानी यांना धमकी दिली होती. अभिषेक सोम यांनी सीमा हैदर आणि अमित जानी यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता तसंच त्यांच्यासाठी विमानाचं तिकिटही बूक केलं. हे तिकिट सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. अमित जानी आणि सीमा हैदर यांनी पाकिस्तानात जावं, अंजून तिकडे आहेत, तिघांनी तिकडेच चित्रपट बनवावा असं अभिषेक घोष यांनी म्हटलं होतं.