मुंबई : एखाद्या प्रसिद्ध शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानात गेल्यावर बऱ्याचदा आपल्याला वस्तू विकत घेतल्यावर कॅरीबॅग दिली जाते. काही ठिकाणी त्याचे वेगळे पैसेही आकरले जातात तर काही ठिकाणी बॅग फ्रीमध्ये दिली जाते. अशीच एक घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेनं दीड हजाररुपयांपेक्षा महागडी बॅग प्रसिद्ध मॉलमधून विकत घेतली. ज्या ब्रॅण्डची ही बॅग होती त्या बॅगच्या दुकानातून तिला कॅरीबॅगसाठी जादा 20 रुपये आकारण्यात आले. या प्रकरणी महिलेनं त्यांना जादा पैसे का घेता असं विचारलं त्यावर त्यांनी उत्तर दिलं नाही.


या प्रकरणी महिला न्याय मागण्यासाठी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. हे प्रकरण कोर्टात गेलं आणि त्या प्रसिद्ध कंपनीला मोठा दंड ठोठावण्यात आला. 


नेमकं काय घडलं? 
एका महिलेनं 1690 रुपयांची बॅग मॉलमधील esbeda दुकानातून घेतली. हा ब्रॅण्ड चामड्याच्या बॅगांसाठी प्रसिद्ध आहे. एसबेडाच्या दुकानात तिने घेतलेल्या बॅगवर कॅरीबॅग देण्यासाठी जास्तीचे 20 रुपये आकारण्यात आले. 


या प्रकरणी महिलेनं मार्केटिंगसाठी 20 रुपये आकारणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. याची तक्रार तिने ग्राहक मंचाकडे केली. मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने या ब्रॅण्डला 35 हजारांचा दंड ठोठवला आहे. 


न्यायालयाच्या सुनावणीनंतर या ब्रॅण्डचे कोणीही न्यायालयात हजर न राहिल्याने एकाबाजूने निर्णय झाला. न्यायालयाने मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल 3 हजार रुपये दंड आणि छळासाठी 10 हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले आहेत. तर ग्राहक कल्याण निधीमध्ये 25 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.