मुंबई : मतदानानंतर काँग्रेसने ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली आहे. काँग्रेसने राज्याच्या विविध भागातून ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या होत्या. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बिघाडाच्या जवळपास १५२ लेखी तक्रारी केल्या होत्या. जवळपास २००च्या पुढे राज्यातून तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे ईव्हीएम मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये जॅमर बसवा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये जामर बसवा, अशी मागणी काँग्रेसने या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, राज्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबद्दल ३६१ तक्रारी आल्या होत्या. त्यात काँग्रेस १५२, शिवसेना ८९ आणि इतर पक्षांच्या १२० तक्रारी होत्या. त्या तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही शंका उपस्थित करण्यात येत आहे. 


मतदानाच्या दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात ३ हजार ४४५ ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्या. तर, प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी पाच ते सहापर्यंत ४ हजार ६९८ ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन नादुरुस्त झाल्या होत्या.