बदलापूर : शिवसेनेने आपलं हिंदुत्व गहाण ठेवलंय आणि त्याला मुक्त करण्याचं काम राज ठाकरे ( raj Thackarey ) करत आहेत. त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणांमध्ये 'हिंदू जननायक' अशी भावना निर्माण झाली आहे, असं मत माजी मंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी व्यक्त केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका खाजगी कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत आज बदलापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बीडमध्ये ह. भ. प. म्हस्के महाराज यांच्यावर हल्ला झाला. परंतु, विचारांची लढाई ही विचाराने लढली पाहिजे. 


महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून विचारांची लढाई गुद्द्यावर आली आहे. म्हणूनच हे सरकार दाऊदचे आहे का ? असा मला विचार पडल्याचं त्यांनी म्हटलं.


राज ठाकरे यांनी 3 मे पर्यतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरे यांनी असा अल्टिमेटम देणं हे राज्य सरकारचं अपयश आहे. आपलं अपयश झाकायचे आहे त्यामुळेच सरकार फालतू विषय चघळत आहे. या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला आंधळा, बहिरा आणि मुका राजा मिळालाय अशी जळजळीत टीका खोत यांनी यावेळी केली