`एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड`च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
Mumbai : एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.लि.चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.
मुंबई : 'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.लि.चे प्रवर्तक सदानंद कुंदर (Sadanand Kunder) यांना'आयसीटी' मुंबई (पूर्वीचे UDCT)आणि 'द कलर सोसायटी' यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिषदेत कलर इंडस्ट्रीतील प्रतिष्ठेच्या 'जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित (Lifetime Achievement Award) करण्यात आलं. सदानंद कुंदर यांना 'पेंट' उद्योग क्षेत्रातील भरीव कार्यासाठी हा पुरस्कार जे.बी. जोशी, पद्मभूषण व आयसीटीचे माजी संचालक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौजन्य कलरच्या संचालिका प्रिया भूमकर, उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे सीईओ हरी कुमार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
'पेंट' निर्मिती उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिंना त्यांच्या योगदानाबद्दल 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान केला जातो. याआधी एशियन पेंट्सचे अश्वीन दाणी, कॅमलीनचे सुभाष दांडेकर आदि मान्यवरांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. सदानंद कुंदर यांच्या पेंट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण योगदानांबद्दल त्यांना हा विशेष प्रेरणादायी 'जीवनगौरव पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे. सदानंद कुंदर हे पेंटउत्पादन क्षेत्रात गेली 40 वर्षे धडाडीने कार्यरत असून त्यांचे पेंट निर्मिती, जहाजबांधणीसाठी पेंटकॉन्ट्रॅक्टिंग आणि ONGC या क्षेत्रांमध्ये मध्ये मोलाचे योगदान आहे.
1981 मध्ये, वयाच्या 18 व्या वर्षी, घरच्या आर्थिक अडचणींमुळे सदानंद. कुंदर उडुपीहून मुंबईत आले आणि त्यांनी अवघ्या 9 रुपये रोजंदारीवर कनिष्ठ पेंट पर्यवेक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. 1984 मध्ये स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरु करून घोडबंदर ,ठाणे इथलया शिपयार्ड कंपनीचं पहिलं कंत्राट मिळविण्यात ते यशस्वी झाले. तेव्हापासून गेली चार दशके पेंट उद्योगक्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केलं असून त्यांची घोडदौड अविरत सुरु आहे. माझगाव डॉक लिमिटेड, एल अँड टी, चौगुले ग्रुप, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून त्यांना अग्रक्रमाने प्राधान्य दिलं जातं.
पुरस्कार मिळाल्यावर कृतज्ञता व्यक्त करताना, सदानंद कुंदर म्हणाले 'पेंट उत्पादन क्षेत्रात मी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी ऋणी आहे. नव्या भारताच्या विकासात भरीव योगदान देण्याऱ्या तरुण उद्योजकांसाठी माझा अनुभव नक्कीच प्रेरणादायी ठरेल, त्यातून भावी प्रतिभावंत उद्योजक या क्षेत्रालालाभतील अशी मला अशा आहे'
एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेडबद्दल
एक्सेल पेंट्स, हाय परफॉर्मन्स कोटिंग्ज उत्पादनातील एक अग्रगण्य कंपनी आहे, भारतीय नौदल,भारतीय तटरक्षक दल, माझगाव डॉक, L&T,चौगुले ग्रुप, भारत फोर्ज, ONGC आणि संरक्षण क्षेत्रातील अनेक OEMआस्थापनांसाठी विश्वासूभागीदार म्हणून काम करते.