पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळणार?
पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३१ जुलै ही पीकविमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी याकरता राज्य सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३१ जुलै ही पीकविमा अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
गेले दोन दिवस शेतक-यांच्या रांगा पीकविमा अर्ज दाखल करण्यासाठी लागल्या होत्या. विरोधी पक्षांनीही पीकविमाच्या मुदतवाढी मागणी केली आहे.
विधान भवनात मुख्यमंत्र्यांनीही पीकविमा मुदतवाढीचे संकेत दिले होते. यासाठी राज्याची केंद्र सरकारशी बोलणीही सुरु आहे. त्यामुळे पीक विमा योजनेला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याचं समजतंय.