विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर इतक्या कोटींची उधळपट्टी
Maharashtra Legislative Council Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची (Maharashtra Legislative Council Elections 2022) लगबग सुरु झाली आहे. विधान परिषदेची निवडणुक अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक होत आहे. त्याआधी आमदारांची राजकीय पक्ष फाईव्ह स्टार मध्ये बडदास्त ठेवत आहेत. (expenditure of crores of rupees on mla before maharashtra legislative council elections 2022)
या फाईव्ह स्टारमध्ये राहण्याच्या खर्चाचा आकडा ऐकून डोळे पांढरे फट्ट पडल्याशिवाय राहणार नाहीत. आमदारांच्या रॉयल ट्रिटमेंचा खर्च जवळपास 13 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे 13 कोटी फक्त राहण्याचा खर्च असणार आहे. इतर खर्च हा वेगळा असणार आहे. त्यामुळे फक्त राजकीय घोडेबाजारापोटी अनेक कोटींचा चुराडा होणार आहे.
सोमवारी मतदान झाल्यावरही आमदारांचा तिथेच मुक्काम असेल. शिवसेनेने आपल्या 55 आमदारांना पवईत वेस्ट इन हॉटेलमध्ये ठेवलंय. या हॉटेलचं भाडं 10 हजार ते 13 हजार रूपये प्रति दिन आहे. राष्ट्रवादीचे 51 आमदार मुंबईत ट्रायडंट हॉटेलमध्ये आहेत. भाजपने आमदाराची सोय ताज प्रेसिडन्सी हॉटेलमध्ये केलीय. त्यामुळे आमदार तुपाशी आण जनता उपाशी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.