दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार ही योजना अपयशी ठरल्याचे 'कॅग'कडून नमूद करण्यात आले आहे. या योजनेवर ९६३४ कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज  भागवण्यात व भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचे कॅगने म्हटले आहे. 'कॅग'चे हे ताशेरे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. जलयुक्त शिवार ही देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. तत्कालीन सरकारकडून या योजनेचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. मात्र, आता कॅगने या योजनेमुळे मूळ उद्दिष्टांची पूर्ती झालीच नसल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने ओढलेले ताशेरे पुढीलप्रमाणे


*या योजनेसाठी जलयुक्त शिवारअभियानामुळे राज्यातील गावदुष्काळमुक्त करण्याचे उद्धिष्ट सफल न झाल्याचा कॅगचा ठपका
* हे अभियान राबवलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यात अपयश आल्याचा कॅगचा निष्कर्ष
* अभियान राबवलेल्या गावात पिण्याचे  पाण्याची गरज भागवण्यासाठी टँकर सुरू असल्याचे कॅगने आणले निदर्शनास
* जलयुक्त शिवरच्या कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी कोणतीही कार्यपद्धती अवलंबली नाही
* जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कॅगने पाहणी केलेल्या १२० गावांपैकी एकही गावामध्ये दुरुस्ती व देखभालीसाठी राज्य सरकारने अनुदान दिले नाहीय
* चार जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर या जिल्ह्यात  जलयुक्त शिवरची कामे योग्य प्रकारे झाली नाही. या कामांसाठी  २६१७  कोटी रुपयांचा खर्च झाला होता.
* जलयुक्तची अनेक काम निकृष्ट झाला कॅगचा ठपका. पाण्याची साठवण निर्मिती कमी असतानाही गावे जलपरिपूर्ण म्हणून घोषित केल्याचा कॅगचा ठपका
* जलयुक्त शिवार योजनेचे मुख्य उद्धिष्ट भूजल पातळीत वाढ करणे होते. पण अनेक गावामध्ये वाढ होण्याऐवजी भूजल पातळी घटल्याचे निदर्शनास आले.
* या योजनेतंर्गत केलेल्या कामाची छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली नाहीत. अनेक कामांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन झाले नाही.