Fake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
Fake Call Center Busted : एका रिसार्टमध्ये दररोज पहाटे 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या ऑर्डर्स, मुंबई पोलीस पडले बुचकळ्यात अन् त्यानंतर समोर आले धक्कादायक वास्तव...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. (Mumbai News)
Fake Call Center Busted : उन्हाळ्या सुट्टी (Holiday Season) असलेल्याने पर्यटन स्थळं (Holiday Package) ही पर्यटकांनी फुलली आहेत. त्यामुळे रिसार्ट आणि हॉटेल (Holiday Package Fraud)चालकांची चांदी सुरु आहे. मुलांना सुट्टी असली तरी पालकांना ऑफिसमधून विकेंडलाच फुरसत मिळते. मग अशावेळी विकेंडला रिसार्ट आणि हॉटेल फुल्ल असतात. विकडेजमध्ये फार गर्दी नसते. मग एका रिसार्टमध्ये पहाटे 4 वाजता दररोज 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या आर्डर्स (breakfast orders) ....हे कसं काय एवढा नाश्ता दररोज? मुंबई पोलीसही या घटनेने बिचकळ्यात पडली. (Mumbai Crime)
नाश्त्याने उघडलं धक्कादायक प्रकार
मुंबई पोलिसांची (mumbai police) त्या नाश्तानंतर झोप उडाली. सूत्र हलली, पोलिसांनी (Maharashtra News) या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्याचं ठरवलं. मग मुंबईतील हे कुठलं रिसार्ट आहे की जिथे पर्यटकांची एप्रिल महिन्यात दररोज गर्दी होती. शोध सुरु झाला रिसार्टचा पत्ता लावण्यात आला. तेवढ्यात पोलिसांनी टीप मिळाली बनावट कॉल सेंटरची...मग काय पोलिसांचा संशय अधिक बळवला. पोलिसांनी 11 एप्रिल 2023 ला रिसॉर्टवर छापा टाकला. छाप्या टाकल्यानंतर बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला. (Mumbai Fake Call Center)
त्या रिसॉर्टमधून 60 लोक रात्रीच्या वेळी कॉल सेंटर चालव होते. या बनावट कॉल सेंटरमधून ऑस्ट्रेलियातील लोकांना गंडा घालण्यात येतं होता. या कॉल सेंटरमधील सर्व कर्मचारी सायबर तज्ज्ञ होते. ही लोकं रोज विदेशी बँकांच्या ग्राहकांची दररोज लाखो डॉलर्सची फसवणूक करत होती. (fake call Centre at Virar Resort bulk breakfast orders lead mumbai police maharashtra Crime news in marathi)
हे कर्मचारी फोन कॉल आणि मेलच्या ओटीपीने या लोकांचे बँक खाते हॅक करून पैशाची अफरातफरी करायचे. या प्रकरणात पोलिसांनी रिसॉर्ट मालकासह 47 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे रिसॉर्ट विरार जवळील राजोडी बीचवरील (Virar Resort) आहे.
महिलांचाही समावेश
या रिसॉर्टमधील कर्मचारी हे पंजाब, दिल्ली, उत्तराखंड आणि हरियाणातील होते. एकूण 53 आरोपींपैकी 13 महिला आणि 40 पुरुष आहेत. या धाडीमध्ये मुंबई पोलिसांनी 20 लाखांचा माल जप्त केला आहे.
कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार कोण?
डीसीपी सुहास बावचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अटकेत असलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत किती लोकांनी यांनी गंडा घातला त्याचा तपास केला जात आहे. त्याशिवाय या कॉल सेंटरमागील सूत्रधाराचाही पोलीस शोध घेत आहेत.