मुंबई : अमली पदार्थविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेल्या NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट उघडण्यात आलं आहे. या अकाऊंटवर वांद्रे भागात छापेमारी केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच नवाब मलिकांशी संबंधित वादावरही चर्चा करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी हे अकाऊंट सुरु झालं. सुरुवातीला या अकाऊंच्या 'डीपी'मध्ये एनसीबीचा लोगो होता.मात्र काही वेळानंतर त्यात बदल करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनसीबी लोगोऐवजी 'नो ड्रग्स' असा डीपी ठेवण्यात आला. तसेच हे खाते एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे नसून त्यांना समर्थन देणाऱ्याचे आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान हे अकाऊंट बनावट असल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.  



एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे अमली पदार्थविरोधी कारवाईने चर्चेत आले आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटकेनंतर ते चर्चेत आहेत. आर्यननंतर आता अभिनेत्री अनन्या पांडे देखील एनसीबीच्या रडारवर आहे.  आनन्याची देखील ड्रग्स प्रकरणी 2 वेळा चौकशी करण्यात आली आहे. 


चौकशीसाठी अनन्याला  उशिर झाल्यामुळे समीर वानखेडे यांना तिला फटकारलं होतं. आता अनन्याला पुन्हा सोमवारी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावलं आहे. तर दुसरीकडे 26 ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुरूवात होणार आहे. आता या प्रकरणी काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.