शेतकरी पीक विमा : ऑफलाईन अर्ज स्वीकारणार, रविवारी बॅंका सुरु
शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या रविवारीही राज्यातील बँका सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई : शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता उद्या रविवारीही राज्यातील बँका सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती स्थगित करण्यात आलेय. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०१७ ही अंतिम मुदत आहे.
आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. म्हणून रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निम शहरी भागातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
- प्रधानमंत्री पीक विम्यासाठी रविवारीही बँका सुरू
- शेतकऱ्यांच्या अर्जाचा ऑफलाईन स्वीकार करणार
- काळजी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- बँक कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज कारण्यास सुरूवात
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2017 ही अंतिम मुदत आहे
आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे
- जनसुविधा केंद्र तसेच बँकांमध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे
- त्याची दखल घेऊन रविवारी सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण व निम शहरी भागातील बँका सुरू ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत
- ज्या बँकांची सोमवारी साप्ताहिक सुटी असते त्यांनी देखील सोमवारी कामकाज चालू ठेवण्याबाबत रिझर्व्ह बँकेने कळविले आहे