मुंबई : केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे. तसेच जपानची आर्थिक मंदी दूर करण्यासाठी बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. तर राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिले आहे. आम्ही दिवाळीपर्यंत वाट पाहत आहेत. त्यानंतर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा पवार यांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीच्या तारखा सरकारने जाहीर केल्या आहेत.आता सरकारने दिवाळीची तारीख दिली आहे. तोपर्यंत वाट बघावी आणि कर्जमाफी झाली नाही तर ५ नोव्हेंबरला औरंगाबादला बैठक घेतली जाईल, त्यानंतर राज्यात संघर्ष सुरु करण्यात येील. त्यात माझ्यासह सगळ्यानी सहभागी व्हावे, अशी विनंती किसान मंचाने केली आहे आहे. त्याला मी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारविरोधात पवार रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिलेत.


दरम्यान, पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढवलाय.  महाराष्ट्र राज्यात केवळ बुलेट ट्रेनची तीन स्टेशन असणार पण पैसे दोन्ही राज्यांनी अर्धे अर्धे भरायचे हे चुकीचे आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्राला लाभदायक नाही, त्यापेक्षा मुंबई लोकलकडे लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी दिलाय. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगात मोठी वाढ झालेय, शेतकरी कर्जमाफी न झाल्यास आंदोलन, पुरकारण्याचा इशारा शरद पवार यांनी दिलाय. 


पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे


-  आजच्या बैठकीला राज्यातील प्रमुख सहकारी उपस्थित होते
- आमच्या पक्षाच्या किसान मंचाने मागील ५५ दिवस राज्यभर दौरे केले
- काल नाशिकला त्याची बैठक झाली
 - कर्जमाफीच्या तारखा सरकारने जाहीर केल्या
- आता सरकारने दिवाळीची तारीख दिली आहे
- तोपर्यंत वाट बघावी आणि कर्जमाफी झाली नाही तर ५ नोव्हेंबरला औरंगाबादला बैठक घेतली जाईल
- त्यानंतर राज्यात संघर्ष सुरू करावा - त्यात माझ्यासह सगळ्यानी सहभागी व्हावे अशी विनंती किसान मंचाने केली आहे, त्याला मी सहमती दर्शवली आहे
- कर्जमाफीचा अर्जातील माहिती खोटी आढळल्यास कर्जमाफीची रक्कम दंडासह वसुल केली जाईल आ़णि मला शिक्षा होईल त्याला मी जबाबदार राहिल अशी टीप अर्जात आहे
- ऑनलाईन अर्जासाठी शेतकऱ्यांकडून 500 रुपये घेतले गेले अनेक ठिकाणी
- वन टाईम सेटलमेंटसाठी दीड लाखांची वरची रक्कम शेतकऱ्यांना भरायचे आहेत, ज्याची ऐपत आहे तो शेतकरी थकीत झाला नसता
 - देशातील मोठी कर्जमाफी अशी घोषणा सरकारने केली
- ३५ हजार कोटीचा आकडा सांगितला
- आमच्या माहितीनुसार ही रक्कम १० ते १२ हजार कोटी असेल
- दिवाळीच्या दरम्यान महागाई प्रश्नावर संघर्ष करण्याची भूमिका आम्ही आजच्या बैठकीत घेतला आहे
- कर्जमाफी झाली नाही तर ५ नोव्हेंबरपासून असहकार आंदोलन करणार
- यात पवारही उतरणार आहेत
- बेरोजगारी या विषयावरही आम्ही आवाज उठवणार आहोत
- अनेक टेक्स्टाईल बंद झाल्या आहेत
- हजारो लोक बेरोजगार होत आहेत
- लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, महिंद्रा टेक यासारख्या अनेक कंपन्यांनी नोकरकपात केली आहे
- औद्यागिक उत्पादन घटले आहे
- सोशल मिडियावर या सरकारने आक्रस्ताळी भूमिका घेतली आहे
- भाजपानेच सत्तेवर येण्यासाठी सोशल मिडियाचा वापर केला
- आता सोशल मिडियावर सरकार विरोधी लिहले जात आहे 
- सोशल मिडियावर सरकार विरोधात भूमिका मांडली की नोटीस पाठवली गेल्या
- सरकारवर टीका केली की अशा नोटीस पाठवण्याची भूमिका घेतली
- लोकशाहीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे
- एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिज अपघात झाला, अशी स्थिती अनेक ठिकाणी आहेत
- याबाबत आमच्या पक्षाने वेळोवेळी भूमिका मांडली होती
- पण याकडे दुर्लक्ष करायचे आ़णि दुसरीकडे प्रचंड खर्चिक बुलेट ट्रेन आणायची
- पंतप्रधानांची एक क्लिप फिरतेय त्यात त्यांनी बुलेट ट्रेन बाबत विधान केले आहे
- जगाला ताकद दाखवण्यासाठी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन सुरू केली पाहिजे यात कुणी बसणार नाही पण दाखवायला केलं पाहिजे