दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने  पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गंगाभिषण थावरे असे या शेतक-याचे नाव असून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्यात थावरे यांनी तक्रार केली आहे. खते, बियाणे आणि फवारणी औषध निर्मिती कंपन्यांशी संगनमत करून वेधशाळेनं हवामानाचा खोटा अंदाज वर्तवल्याचा आरोप थावरे यांनी केला आहे. 


हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी हवामान खात्याच्या अधिका-यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गंगाभिषण थावरे यांनी केलीय.