शेतकरी नेत्यांना मागण्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं
ज्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई : जीवा पांडू गावित यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं वाचून दाखवली, मंत्रीगट आणि शिष्टमंडळ आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर, हे वाचन करण्यात आलं, यात खालील आश्वासनांचा सहभाग होता. ज्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
मागण्यांवर सरकारने दिलेली आश्वासनं
वनजमिनींचे निलंबित प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
गायरान जमीनीचे दावे-अतिक्रमण नियमित करण्यात येतील
जुनं रेशनकार्ड ६ महिन्यात बदलून देण्यात येतील
मराठवाडा आणि विदर्भातील बोंडअळी आणि गारपीटवर नुकसान भरपाईचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे देण्यात आला आहे, त्याची वाट न पाहता, सर्व मंडळाच्या शेतकऱ्यांना मदतीचं वाटप सुरू करण्यात येईल.
नारपार योजनेसह इतर प्रलंबित योजनांचा पाठपुरावा करणार
२००१ पासून थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल.
३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व मागण्या मान्य होणार
७० ३० सुत्रानुसार दुधाचे दर ठरवण्यासाठी वेगळी बैठक बोलावण्यात येईल
इतर पिकांच्या हमीभाव राज्य कृषीमुल्य आयोग ठरवणार, किंमत ठरवताना किसान सभेचे २ सदस्य घेणार
उस दर समिती देखील गठीत करण्यात येईल.
देवस्थान, इनामी जमीनींवर लवकरच निर्णय घेण्यात येईल.
संजय गांधी निराधर योजनेतील मानधन वाढवण्यात येणार.
वनहक्क कायद्याचे दावे ६ महिन्यात संपवणार
सर्व मागण्या उद्या विधानसभेत मांडणार