मुंबई : विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसच धानावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आलीये.. राज्याचे महसूल आणि मदत पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोंडअळी आणि तुडतुड्या किडीच्या प्रादुर्भावामुळे 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या कापूस, धान पिकाला कोरडवाहू क्षेत्रासाठी 6 हजार 800 रुपये तर बागायतीसाठी 13 हजार 500 रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे उशिरानं का होईना शेतक-यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.. 


दरम्यान ही मदतीची रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे..  या रकमेतून बँकेनं कोणतीही वसूली करु नये असे निर्देश मदत पुनर्वसन आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत..