मातीविना शेतीचा प्रयोग, तुम्ही घरीच भाजीपाला पिकवू शकता
कल्पना शक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो अगदी मातीविना शेती करू शकतो.
प्रशांत अंकुशराव, झी मी़डिया, मुंबई : कल्पना शक्तीच्या जोरावर आपण काहीही करू शकतो अगदी मातीविना शेती करू शकतो, तर इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून ठिबक सिंचन देखील करू शकतो.
मातीविना शेती विकसित
शेती आली की माती ही आलीच, मात्र कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनो माती विना शेती विकसित केली आहे, तसा प्रकल्पच मराठा मंदिर येथे झालेल्या थिंक क्वेस्ट प्रदर्शनात माडण्यात आले होते.
भाजीपाला किंवा फुल झाडे लावू शकता
या प्रकल्पाद्वारे आपल्या इमारतीच्या गच्चीवर देखील भाजीपाला किंवा फुल झाडे लावू शकता, मातीत असणारे क्षार आणि जीवनसत्व यात झाडाला पुरवले जातं, माती विरहित आणि पाण्याची बचत होणार आहे.
ठिंबक सिंचन करताना इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर
माती नसताना ही शेती होऊ शकते, तसे ठिंबक सिंचन करताना इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होणार आहे, इलेक्ट्रॉनिक सेन्सरच्या माध्यमातून जमीन कोरडी आहे की ओली, याचा आढावा घेत शेतीला ज्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे, त्याच प्रमाणात पाणी पाठवले जाते, त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात शेतीला मिळते आणि शेतीच्या उत्पादनात भर पडते.
घरगुती कपडे धुण्याचे यंत्र सर्वांचे लक्ष वेधतं
थिंक क्वेस्ट 2018 मध्ये अनेक प्रोजेक्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सादर केले आहेत, ज्यात महिलासाठी घरगुती कपडे धुण्याचे यंत्र सर्वांचे लक्ष वेधतं आहे, ज्यामुळे महिलांचे बजेट आणि श्रम वाचणार आहे.
कानाकोपऱ्यात असे अनेक रेंचो
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे अनेक रेंचो तयार होत आहेत, आणि या रेंचोना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कॉलेज पुढाकार घेत आहेत, त्यामुळे शेतकऱयांना आणि सामान्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.