फास्ट न्यूज | १६ मे २०१८
1)कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेस-जेडीएसच्या ११७ आमदारांची राज भवनावर धडक, सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत असल्याचा दावा2) भाजपच्या येडियुरप्पांना सरकार बनवण्याची संधी दिल्यास काँग्रेस करणार निदर्शनं, लोकशाही वाचवण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याची तयारी3) १०० कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देऊन रेवण्णांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न, जेडीएसच्या कुमारस्वामींचा खळबळजनक आरोप, तर भाजपचे सहा आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा4) कर्नाटकात भाजपनं सत्तेचा दुरुपयोग करू नये, सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होईल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा, राज्यपाल भाजपचे असल्यानं सत्ताही त्यांचीच येण्याचं राजचं भाकित...5) खडसेंना क्लीनचीट देणारा एसीबीचा अहवाल विसंगत, झी २४ तासच्या हाती लागला अहवाल, कुटुंबीयांचं हित लक्षात घेण्यासाठी खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचं अहवालात नमूद...6) डोण्ट प्ले विथ मी... तुकाराम मुंढे यांचा नाशिकच्या बिल्डरांना इशारा, ३१ मेपर्यंत बांधकामं नियमीत केली नाही तर देवच वाचवू शकेल, तुकाराम मुंढेंनी सुनावले खडे बोल...7) पावसाळ्याआधीच सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची बरसात, मुंबई तुंबल्यास राज्य सरकार जबाबदार, मुंबईच्या महापौरांनी फोडले खापर, तर गेल्यावेळी मुंबई कशी काय तुंबली, गिरीश महाजनांचा पलटवार...8) 36 हजार रिक्त पदं भरण्याचा राज्यसरकारचा निर्णय, कृषी खातं आणि कृषी खात्याशी संबंधित पदंही भरली जाणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट..9) रमजानच्या महिन्यात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय, मेहबूबा मुफ्तींची शिफारस केंद्र सरकारनं स्वीकारली, मात्र हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देणारच...10) भारतीय संघातून खेळण्यासाठी नागपूरची वैष्णवी भाले सज्ज, युवा बॅडमिंटनपटूची गाथा झी २४ तासवर