मुंबई : केंद्र सरकारने टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी फास्टॅगची (Fastag ) नवी सुविधा सुरु केली आहे.  देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा 1 डिसेंबर 2019 नंतर फास्टॅगद्वारे (Fastag ) भरण्यात यावा, असे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले होते. (Central Motor Vehicles Rules)  मात्र, ही मुदत वाढवून 15 डिसेंबर वाढविण्यात आली. परंतु 1 जानेवारीपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. परंतु मुंबईतील वाहनांसाठी 15 फेब्रुवारीपासूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर फास्टॅग हा बंधनकारक असणार आहे. आता फास्टॅग वाहनचालकांना रोड टॅक्समध्ये पाच टक्के सवलत मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी मार्गावरून प्रवास करणाऱ्या फास्टॅग धारकांसाठी ही सवलत देण्यात य़ेणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने ही घोषणा केलीय. ११ जानेवारीपासून ही सवलत देण्यात येणार असून काही मर्यादित कालावधीसाठीच ही सवलत असणार आहे. केंद्र सरकारने वाहन कायद्यात बदल केले आहेत. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला असून, येत्या १५ फेब्रुवारीपासून सक्ती केली जाणार आहे.


फास्टॅग (Fastag) म्हणजे काय?


राष्ट्रीय महामार्गावरुन  प्रवास करत असाल आणि तुम्हाला टोल भरायचा असेल तर तुमच्याकडे 'फास्टॅग' असणे गरजेचे आहे. हा फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागतो. या टॅगच्या मार्फत 'कॅशलेस' म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरता येणार आहे.


फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. (Central Motor Vehicles Rules) रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी - RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. दरम्यान, सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो.