बुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याची आग कायम
बुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याला काल मोठी आग लागली. आग दुसऱ्यादिवशीही भडकत आहे. दरम्यान, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : बुचर बेटावर असलेल्या पेट्रो केमिकल्स साठ्याला काल मोठी आग लागली. ही आग अजुनही कायम आहे. आग दुसऱ्यादिवशीही भडकत आहे. दरम्यान, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, जलवाहतुकीला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
बुचर आयलँडवरील आग अजूनही भडकलेलीच आहे. जोपर्यंत तेलाचा साठा संपणार नाही तोपर्यंत ही आग विझणार नसल्याची माहिती हाती आलेय.३२ हजार मेटृीक टन हायस्पीड डिझेलच्या साठ्याला आग लागली आहे. बीपीटीच्या अग्निशमन जवानांसह मुंबई अग्निशमन दलाचेही जवान रात्रभर आग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत.
बुचर आयलँडवर काल मोठी आग लागली. या बुचर बेटावर पेट्रो केमिकल्सचे मोठमोठे साठे आहेत. या साठ्यांना ही भीषण आग लागली. मुंबईत दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि विजा कडाडत होत्या. यावेळी वीज पडून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बेटावरील क्रमांक १३ आणि १४ या टाक्यांमध्ये ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जावन तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.अजुनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलेले नाही. दुसऱ्या दिवशी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, या भागातून होणाऱ्या जलवाहतुकीला अजिबात धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आलाय.