मुंबई : माझगावच्या सेल्स टॅक्स भवनाला आग लागली आहे. इमारतीच्या ९व्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २२ गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कार्यालय असल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. कार्यालय असल्यामुळे महत्त्वाच्या कागदपत्रांचा साठा याठिकाणी आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

८, ९, १०व्या मजल्यावर आग मोठ्या प्रमाणात लागली आहे. त्याचप्रमाणे सध्या रेस्कू ऑपरेशन देखील सुरू करण्यात आलं आहे. दुपारी १२ : ३५ वा. सुमारास ही आग लागली आहे. फक्त कार्यालयात आग लागली आहे. बाकी कोणत्याच मजल्यावर आग लागली नसल्याचं समोर येत आहे. 



या आग्निकांडात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नसली तरी रेकॉर्ड बूक वाचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगिवर नियंत्रण मिळवणे शक्य असले तरी ऑफिसमधील उपकरनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या घटनेचा कोणताही परिणाम वाहतूकीवर झालेला नाही.