मुंबईतील विलेपार्ले येथे रहिवासी इमारतीला आग
इमारतीचे दोन मजले आगीच्या भक्षस्थानी
मुंबई : विलेपार्ले येथे एका रहिवासी इमारतीला आग लागली आहे. लाभ श्रीवल्ली असं या इमारतीचं नाव असून, विलेपार्ले पश्चिम येथे बजाज रोड येथे ही इमारत आहे. इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागल्याचं कळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.
एएनआय या वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर घटनास्थळाचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आगीचं स्वरुप लक्षात आलं. घटनास्थळावरुन येणाऱ्या माहितीनुसार आगीची माहिती मिळताच तेथे तात़डीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.. श़ॉक सर्किटमुळे आग लागल्याची शंका वर्तवण्यात आली होती.
इमारतीत लागलेल्या आगीतून अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ज्यामध्ये नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. गर्दीची वेळ, रस्त्यावरील वरदळ पाहता बचावकार्यामध्ये सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.