कमला मिल दुर्घटना, अनधिकृत बांधकामांवर कारवाई
कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात 14 जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.
मुंबई : कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात 14 जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.
शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात
शुक्रवारपासून मिल परिसरातल्या हॉटेल, पबच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आलीय. कमला मिल, रघुवंशी मिलमधील स्काय व्ह्यु आणि सोशल हॉटेल तर रघुवंशी मिल कंपाउंडमधील पनय फ्युम्स तसंच शिशा स्काय लाउंजच्या अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करण्यात आलीय.
यासाठी पालिकेच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आलीय. ही कारवाई दिवसभर सुरु राहणार आहे.