मुंबई :दादर येथील पोलीस कंपाऊंडला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.  या आगीमागचे नेमके कारण अद्याप समजले नाही. पण श्रावणी चव्हाण या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणीचे आई बाबा लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. त्यात घरचा दरवाजा बाहेरुन बंद होता त्यामुळे या घटनेकडे संशयाने पाहीले जात आहे. श्रावणीचे आई बाबा घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. आग लागल्यानंतर आजुबाजूच्या शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवातीला शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे सांगण्यात येत होते. पण अग्निशमन दलाला घरामध्ये रॉकेलचा डब्बा मिळाला आहे. त्यामुळे ही आत्महत्या आहे ? अपघात आहे ? की आणखी वेगळा प्रकार आहे का ? याचा शोध सुरु आहे. या सर्व प्रकारामुळे संशयाचा धुर येत आहे. तरी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.