मुंबई : कमला मिलमध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २ गाड्या पोहोचल्या आहेत. शॉर्टसर्किंटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग सर्वत्र पसरू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. एका इमारतीच्या बी विंगमध्ये ही आग लागली आहे. आग आटोक्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीचं प्रमाण कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणून ही आग आधी झाला होता. तेवढी विध्वंसक नसल्याचंही सांगण्यात येत आहे. या आगीत कुणी अडकलं तर नाही ना याची देखील तपासणी केली जात आहे.
 


कमला मिलमध्ये यापूर्वी, २८ डिसेंबर २०१७ रोजी,  एका छतावरील हॉटेलला लागलेल्या आगीत १४ लोकांना जीव गमवावा लागला होता.  यात ११ महिलांचा समावेश होता, २१ लोक गंभीर जखमी झाले होते.